Spotify देणार आहे youtube ला टक्कर, टेस्ट करत आहे हे नवीन फीचर.

Deal Score0
Deal Score0

स्पॉटीफाय ने आपले नवीन फीचर टेस्टिंगला घेतले आहे. हे येणारे फीचर पूर्णपणे youtube ला टक्कर देणार आहे. कारण कोणताही म्यूजिक वीडियो पाहण्यासाठी यूज़र यूट्यूबचा वापर करतो. पण आता, ते डायरेक्ट स्पॉटीफाय ह्या लोकप्रिय म्युसिक ॲपमध्येच ह्या सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहे.

ह्या फीचरमुळे यूट्यूबला आता मोठा compitition मिळणार आहे अशी शक्यता आहे.

यूट्यूब आणि स्पॉटिफाईमध्ये काय फरक आहे?

यूट्यूब आणि स्पॉटिफायमध्ये विविधतेबद्दल बोलायचे झाले तर दोन्ही पण लोकप्रिय ॲप आहेत. ज्याचा वापर भारतातच नाही तर जगभरातील लोक करतात. हे दोन्ही ॲप आपल्याला आपल्या स्मार्टफोन वर वापरता येतात.

दोन्ही ॲप काय काम करतात ह्या बदल बोलायचे झाले तर, यूट्यूब हा एक वीडियो शेअरिंग ॲप आहे. तर दुसरीकडे स्पॉटिफाय हा ॲप खास करुन म्यूजिक चाहत्यांसाठी आहे. 

स्पॉटिफाय ह्या ॲपचा वापर जास्त करून लोक गाणी ऐकण्यासाठी करतात. तर यूट्यूबचा वापर भरपूर गोष्टीसाठी केला जातो. जसे की काही नवीन शिकण्यासाठी, नवनवीन वीडियो पाहण्यासाठी आणि जास्त करुन मनोरंजनासाठी. 

आता पूर्ण म्यूजिक वीडियो स्पॉटिफाई वर बघायला मिळतील

कोणताही नवीन अल्बम किंवा गाणे प्रकाशित करण्यासाठी जास्त वापरला जाणारा प्लेटफॉर्म म्हणजे यूट्यूब. ज्यावर मोठ्या म्यूजिक कंपन्या आपला म्यूजिक वीडियो प्रमोशनसाठी प्रकाशित करतात. 

त्यामुळे बरीचशी लोक कोणत्याही गाण्याचा पूर्ण वीडियो पाहण्यासाठी युट्यूबया ॲपचाच वापर करत असतात. स्पॉटिफायने ही संधी पाहिली आणि ह्या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. 

हे फीचर यूज़रना मोबाईल ॲप सोबत इतर ठिकाणी जसे की desktop आणि TV वर पण पाहायला मिळणार आहे. 

स्पॉटिफाई नक्की काय करणार आहे 

जसे आपण समजलो की स्पॉटिफाय गाणी ऐकण्याच्या सेवेशिवाय यूज़रना आता गाण्याचे वीडियो पाहण्याची सेवा पण प्रदान करणार आहे. आता पर्यंत ही सेवा युट्यूब आणि फेसबुक या सारखे ॲप देत होते. ह्यात यूट्यूब ह्या ॲपचा मोठा वाटा आहे. 

२०१९, मध्ये कंपनीने canvas ह्या नावाचे वैशिष ॲपमध्ये जोडले होते, ज्यामध्ये आर्टिस्ट लोकं ३-८ सेकंडचा वीडियो क्लिप त्यांचा सोंग् ला जोडू शकत होती. हा वीडियो गाणे सुरू असताना वारंवार प्ले होत असायचा. 

गेल्या वर्षी २०२३ मध्ये कंपनी ने Clips नावाचे फीचर आणले जेथे आर्टिस्ट लोकं ३० सेकंडचा वीडियो जोडू शकत होती.

कधी वापरायला मिळणार हे फीचर 

सध्या हे फीचर टेस्टिंगमध्ये आहे, जेथे हे फीचर थोड्या यूज़रना उपलब्ध करुन दिले गेले आहे. भारतात हे फीचर कधी येईल याची घोषणा अजून कंपनीने केली नाही. 

कंपनीने सांगितले आहे की हे फीचर सुरवातीला यूनाइटेड किंगडम, जर्मनी, इटली, पोलंड, स्वीडन, ब्राझील, कोलंबिया, इंडोनेशिया आणि केन्या ह्या देशांमधील प्रीमियम सब्स्क्राइबरना उपलब्ध करुन देणार आहे. 

ह्या सर्विसमध्ये यूज़रना लोकप्रिय आर्टिस्ट जसे की Ed sheeran, Doja cat आणि काही local artist यांचे गाण्याचे  वीडियो प्लेटफॉर्म वर पाहायला मिळणार आहे. 

हे फीचर कसे वापरायचे 

जर तुम्हाला हे फीचर अजून मिळाले नसेल; तर सर्व प्रथम ॲप अपडेट करा. तसेच सध्या हे फीचर टेस्टिंगमध्ये आहे. त्यामुळे सर्वाना उपलब्ध नाही आहे. 

फीचर वापरण्यासाठी “switch to video” नावाचे नवीन टॉगल बटन ऑप्शन असेल. ह्या बटणचा वापर करुन तुम्ही हे फीचर वापरू शकता. 

ऑप्शनचा निवड केल्यावर, गाण्याचा वीडियो आपोआप प्ले केला जाईल, जिथे गाण्याच्या आवाजा सोबत वीडियो पण पाहायला मिळेल. 

तसेच, जर फक्त ऑडियो ऐकायचं असेल तर हा ऑप्शन बंद करावा लागेल.

handynews24.com
handynews24.com
Logo
Register New Account